भजनी मालिका
← भजनांकडे परत

भ्रतारेंसी भार्या बोले गुज गोष्टी । मज ऐसी कष्टी नाहीं दुजी

bhratarensi bharya bole guj goshti | maj aisi kashti nahin duji

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भ्रतारेंसी भार्या बोले गुज गोष्टी । मज ऐसी कष्टी नाहीं दुजी ॥१॥ अखंड तुमचें धंद्यावरी मन । माझें तों हेळण करिती सर्व ॥ध्रु.॥ जोडितसां तुम्ही खाती हेरेंचोरें । माझीं तंव पोरें हळहळीती ॥२॥ तुमची व्याली माझे डाई हो पेटली । सदा दुष्ट बोली सोसवेना ॥३॥ दुष्टव्रुति नंदुली सदा द्वेष करी । नांदों मी संसारीं कोण्या सुखें ॥४॥ भावा दीर कांहीं धड हा न बोले । नांदों कोणां खालें कैसी आतां ॥५॥ माझ्या अंगसंगें तुम्हांसी विश्रांति । मग धडगति नाहीं तुमची ॥६॥ ठाकतें उमकतें जीव मुठी धरूनि । परि तुम्ही अजूनि न धरा लाज ॥७॥ वेगळे निघतां संसार करीन । नाहीं तरी प्राण देतें आतां ॥८॥ तुका म्हणे झाला कामाचा अंकित । सांगे मनोगत तैसा वर्ते ॥९॥