भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोळ्या भाविकांसी देख । अवघा एक विठ्ठल

bholya bhavikansi dekh | avagha ek viththal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भोळ्या भाविकांसी देख । अवघा एक विठ्ठल ॥१॥ दुजा नाहीं आन कोण्ही । पाहतां तिहीं त्रिभुवनीं ॥२॥ जन्ममरणाचें सांकडें । नाहीं कोडें मुक्तीचें ॥३॥ मोक्ष तो उभा जोडोनी हात । एका जनार्दनीं तिष्ठत ॥४॥