भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोळे ते साबडे गोपिका ते भावें । चुंबन बरवें देती तया

bhole te sabade gopika te bhaven | chumban baraven deti taya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भोळे ते साबडे गोपिका ते भावें । चुंबन बरवें देती तया ॥१॥ यज्ञमुखीं तोंड करी जो वाकुंडें । तो गोपिकांचे रोकडें लोणी खाये ॥२॥ घरां नेऊनियां घालिती भोजन । पंचामृत जाण जेवाविती ॥३॥ एका जनार्दनीं व्यापक तो हरी । गोकुळा माझारीं खेळ खेळे ॥४॥