भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोळे भाविक हे जुनाट चांगले । होय तैसें केलें भक्तिभावें

bhole bhavik he junat changale | hoy taisen kelen bhaktibhaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भोळे भाविक हे जुनाट चांगले । होय तैसें केलें भक्तिभावें ॥१॥ म्हणउनि चिंता नाहीं आम्हां दासां । न भ्यो गर्भवासा जन्म घेतां ॥ध्रु.॥ आपुलिया इच्छा करूं गदारोळ । भोगूं सर्वकाळ सर्व सुखें ॥२॥ तुका म्हणे आम्हां देवाचा सांगात । नाहीं विसंबत येर येरां ॥३॥