भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोळा देव भोळा देव । उंच नीच नेणें भाव

bhola dev bhola dev | unch nich nenen bhav

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भोळा देव भोळा देव । उंच नीच नेणें भाव ॥१॥ चोखियाच्या मागें धांवे । शेलें कबिराचे विणावे ॥२॥ खुरपुं लागे सांवत्यासी । उणे येवो नेदी कोणासी ॥३॥ विष पिणेंक धाउनी जाणें । भाविकाची भाजी खाणें ॥४॥ कवण्याची तो आवडी मोठी । एकाजनार्दनीं लाळ घोटी ॥५॥