भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोजनाच्या काळीं । कान्हो मांडियेली आळी । काला करी वनमाळी । अन्नेएकवटा

bhojanachya kalin | kanho mandiyeli ali | kala kari vanamali | anneekavata

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भोजनाच्या काळीं । कान्हो मांडियेली आळी । काला करी वनमाळी । अन्नेएकवटा । देई निवडुनी । माते म्हणतो जननी । हात निपटून मेदिनी । वरी अंग घाली ॥१॥ कैसा आळी घेसी । नव्हे तें चि करीसी । घेई दुसरें तयेसी । वारी म्हणे नको ॥ध्रु.॥ आतां काय करूं । नये यासि हाणूं मारूं । नव्हे बुझावितां स्थिरू । कांहीं करितांही । हातेची केलें एके ठायीं । आतां निवडूनि खाई । आम्हा जाचितोसि काई । हरीसि म्हणे माता ॥२॥ त्याचें तयाकुन । करवितां तुटे भान । तंव झालें समाधान । उठोनियां बैसे । माते बरें जाणविलें । अंग चोरूनि आपुलें । तोडियलें एका बोलें । कैसें सुखदुःख ॥३॥ ताट पालवें झाकिलें । होतें तैसें तेथें केलें । भिन्नाभिन्न निवडिलें । अन्नें वेगळालीं । विस्मित जननी । भाव देखोनियां मनीं । म्हणे नाहीं ऐसा कोणी । तुज सारिखा रे ॥४॥ हरुषली माये । सुख अंगीं न समाये । कवळूनि बाहे देती आळींगन । आनंद भोजनीं । तेथें फिटलीसे धणी । तुका म्हणे कोणी । सांडा शेष मज ॥५॥