भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग

bhogen ghade tyag | tyagen anga yeti bhog

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ॥१॥ ऐसें उफराटें वर्म । धर्मा अंगीं च अधर्म ॥ध्रु.॥ देव अंतरे तें पाप । खोटे उगवा संकल्प ॥२॥ तुका म्हणे भीड खोटी । लाभ विचारावा पोटीं ॥३॥