भजनी मालिका
← भजनांकडे परत

भिल्लिणी बाळा वनीं वेंचितां फळा । देखिला रामरावो ठक पाडिलें डोळां

bhillini bala vanin venchitan phala | dekhila ramaravo thak padilen dolan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भिल्लिणी बाळा वनीं वेंचितां फळा । देखिला रामरावो ठक पाडिलें डोळां ॥१॥ गोडणी सोहंमार्गी गीती गाती रामा । आनंदें नाचती दृष्टी देखोनी रामा ॥२॥ देखोनी रामरावो कैसा झाला भावो । सेवितां कंदमुळें आम्हां दिसतो देवो ॥३॥ सफळिता तरुवरीं साचें राम आभासे । पहा जनी वनीं अवघा रामचि दिसे ॥४॥ चारा हरवेठीं बोरा भरुनियां पाटी । फळामाजीं फळ राम सफळीत दृष्टी ॥५॥ आसनी शयनीं आम्हां आणीक बोधु । एका जनार्दनीं गोड लाविला वेधू ॥६॥