भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावों देव कीं देवीं भाव । दोहींचा उगव करुनी दावा

bhavon dev kin devin bhav | dohincha ugav karuni dava

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भावों देव कीं देवीं भाव । दोहींचा उगव करुनी दावा ॥१॥ भावा थोर कीं देव थोर । दोहींचा निर्धार करुनी दावा ॥२॥ जंव जंव भाव तंव तंव देव । भाव नाहीं तेथें देवाचि वाव ॥३॥ एका जनार्दनीं भावेंचि देव । लटिके म्हणाल तरी हृदयीं साक्ष पहा हो ॥४॥