भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावें करा रे भजन । भावेंक करा नामस्मरण

bhaven kara re bhajan | bhavenk kara namasmaran

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भावें करा रे भजन । भावेंक करा नामस्मरण ॥१॥ भावें जावें पंढरीसी । भावें नाहावें भीमरथीसी ॥२॥ भावें करा प्रदक्षिणा । भावें करा जागरणा ॥३॥ भावें व्रत एकादशी । एका शरण जनार्दनासी ॥४॥