भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावें गावें गीत । शुद्ध करूनियां चित्त

bhaven gaven git | shuddha karuniyan chitta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भावें गावें गीत । शुद्ध करूनियां चित्त ॥१॥ तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ॥ध्रु.॥ आणिकांचे कानीं । गुण दोष मना नाणीं ॥२॥ मस्तक ठेंगणा । करी संतांच्या चरणा॥३॥ वेचीं तें वचन । जेणें राहे समाधान ॥४॥ तुका म्हणे फार । थोडा तरी पर उपकार ॥५॥