भजनी मालिका
← भजनांकडे परत

भरंवसा मानिला परी झाली निरास

bharanvasa manila pari jhali niras

भरंवसा मानिला परी झाली निरास । म्हणोनी कासावीस जीवें झालों ॥१॥ बोलिल्या वचना तें कांही साचपण । नयेचि दिसोन अद्यापवरी ॥२॥ किती किती मन आवरूनी धरूं । कवणासी विचारूं पुसूं आतां ॥३॥ कर्ममेळा म्हणे कर्महीन माझें । भोगणें सहजें सहज असे ॥४॥