भजनी मालिका
← भजनांकडे परत

भरला दिसे हाट । अवघी वाढली खटपट । संचिताचे वाट । वाटाऊनि फांकती

bharala dise hat | avaghi vadhali khatapat | sanchitache vat | vatauni phankati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भरला दिसे हाट । अवघी वाढली खटपट । संचिताचे वाट । वाटाऊनि फांकती ॥१॥ भोगा ऐसे ठायाठाव । कर्मा त्रिविधाचे भाव । द्रष्टा येथें देव । विरहित संकल्पा ॥ध्रु.॥ दिला पाडूनियां धडा । पापपुण्यांचा निवाडा । आचरती गोडा । आचरणें आपुलाल्या ॥२॥ तुका म्हणे पराधीनें । जालीं ओढलिया ॠणें । तुटती बंधनें । जरि देवा आळविती ॥३॥