भजनी मालिका
← भजनांकडे परत

भलतीयासी म्हणती । अहो महाराज निश्चितीं

bhalatiyasi mhanati | aho maharaj nishchitin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भलतीयासी म्हणती । अहो महाराज निश्चितीं ॥१॥ ऐसें अंधळे हे जन । गेले भुलोन संसारें ॥२॥ महराज जनार्दन । नेणती तयाचे चरण ॥३॥ दीना महाराज म्हणती । एका जनार्दनीं सांगूं किती ॥४॥