भजनी मालिका
← भजनांकडे परत

भलते जन्मीं मज घालिसील तरी । न सोडीं मी हरी नाम तुझें

bhalate janmin maj ghalisil tari | na sodin mi hari nam tujhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भलते जन्मीं मज घालिसील तरी । न सोडीं मी हरी नाम तुझें ॥१॥ सुख दुःख तुज देईन भोगितां । मग मज चिंता कासयाची ॥ध्रु.॥ तुझा दास म्हणवीन मी अंकिला । भोगितां विठ्ठला गर्भवास ॥२॥ कासया मी तुज भाकितों करुणा । तारीं नारायणा म्हणवुनि ॥३॥ तुका म्हणे तुज येऊं पाहे उणें । तारिसील तेणें आम्हां तया ॥४॥