भजनी मालिका
← भजनांकडे परत

भला भला पुंडलिका । मानलासी जनलोकां

bhala bhala pundalika | manalasi janalokan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भला भला पुंडलिका । मानलासी जनलोकां ॥१॥ कोण्या काळें सुखा। ऐशा कोण पावत ॥२॥ नातुडे जो कवणे परी । उभा केला विटेवरी ॥ध्रु.॥ अवघा आणिला परिवार । गोपी गोपाळांचा भार ॥३॥ तुका म्हणे धन्य जालें । भूमी वैकुंठ आणिलें॥४॥