भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तीप्रेमसुख नेणवे आणिकां । पंडित वाचकां ज्ञानियांसी

bhaktipremasukh nenave anikan | pandit vachakan dnyaniyansi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्तीप्रेमसुख नेणवे आणिकां । पंडित वाचकां ज्ञानियांसी ॥१॥ आत्मनिष्ठ जरी जाले जीवन्मुक्त । तरी भक्ती सुख दुर्लभ त्यां ॥२॥ तुका म्हणे कृपा करिल नारायण । तरि च हें वर्म पडे ठायीं ॥३॥