भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तीच्या पोटा मुक्ति पैं आली । भक्तीनें मुक्तीतें वाढविलें

bhaktichya pota mukti pain ali | bhaktinen muktiten vadhavilen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्तीच्या पोटा मुक्ति पैं आली । भक्तीनें मुक्तीतें वाढविलें ॥१॥ भक्ति ते माता भक्ति ते दुहिता । जाणोनि तत्त्वतां भजन करी ॥२॥ भक्ती सोडोनि मुक्ति वांछिती वेडी । गुळ सोडोनी कैसी जे गोडी ॥३॥ संतोषोनी भक्ति ज्यासी दे मुक्ति । तोचि लाभे येर व्यर्थ कां शिणती ॥४॥ एका जनार्दनीं एक भाव खरा । भक्ति मुक्ति दाटुनी आलिया घरा ॥५॥