भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तिचिया पोटी बोध काकडा ज्योती

bhaktichiya poti bodh kakada jyoti

भक्तिचिया पोटी बोध काकडा ज्योती । पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती ।।१।। ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा। दोन्ही कर जोडोनी चरणी ठेविन माथा ।।२।। काय महिमा वर्णं आता सांगणे किती। कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती ।।३।। राही रखुमाई दोही दो बाही। मयूर पुच्छ चामरे ढाळिती ठायी ।।४।। तुका म्हणे दीप घेऊनि उन्मनी ते शोभा। विटेवरी उभा दिसे लावण्य गाभा ।।५।।