भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तीचें वर्म जयाचिये हातीं । तया घरी शांति दया

bhaktichen varma jayachiye hatin | taya ghari shanti daya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्तीचें वर्म जयाचिये हातीं । तया घरी शांति दया ॥१॥ अष्टमासिद्धि वोळगती द्वारीं । न वजती दुरी दवडितां ॥ध्रु.॥ तेथें दुष्ट गुण न मिळे नि:शेष । चैतन्याचा वास झालामाजी ॥२॥ संतुष्ट चित्त सदा सर्वकाळ । तुटली हळहळ त्रिगुणाची ॥३॥ तुका म्हणे त्याचा देव सर्व भार । चालवी कामार होऊनिया ॥४॥