भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तांचा पुरवी लळा । तो सांवळा श्रीकृष्ण

bhaktancha puravi lala | to sanvala shrikrushna

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्तांचा पुरवी लळा । तो सांवळा श्रीकृष्ण ॥१॥ उचलिला पर्वतगिरी । नाथिला काळ्या यमुनेतीरीं ॥२॥ अगबग केशिया असुर । मारिला तो कंसासुर ॥३॥ उग्रसेन मथुरापाळ । द्वारका वसविलीं सकळ ॥४॥ द्वारकेमाजीं आनंदघन । शरण एका जनार्दनी ॥५॥