भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्त समागमें सर्वभावें हरी । सर्व काम करी न संगतां

bhakta samagamen sarvabhaven hari | sarva kam kari na sangatan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्त समागमें सर्वभावें हरी । सर्व काम करी न संगतां ॥१॥ सांटवला राहे हृदयसंपुष्टीं । बाहेर धाकुटी मूर्ती उभा ॥ध्रु.॥ मागण्याची वास पाहे मुखाकडे । चिंतिल्या रोकडे मनोरथ ॥२॥ तुका म्हणे जीव भाव देवापायीं । ठेवूनि ते कांहीं न मगती ॥३॥