भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्त देव एके ठायीं ते आवडी । घेऊनिया गुढी जाऊं तेथें

bhakta dev eke thayin te avadi | gheuniya gudhi jaun tethen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्त देव एके ठायीं ते आवडी । घेऊनिया गुढी जाऊं तेथें ॥१॥ पाहूं चरनकमळ वोवाळूं श्रीमुख । होईल तेणें सुख चौदेहांसी ॥२॥ संतांचे ते भार गाती नाचताती । आनंदे डुल्लती विठ्ठल वाचे ॥३॥ एका जनार्दनीं आनंदसोहळा । पाहोनि धालों डोळा डोळीयाचा ॥४॥