भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्त भागवत जीवन्मुक्त संत । महिमा अत्यद्भुत चराचरीं

bhakta bhagavat jivanmukta sant | mahima atyadbhut characharin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्त भागवत जीवन्मुक्त संत । महिमा अत्यद्भुत चराचरीं। ऐसिया अनंतामाजी तूं अनंत । लीलावेश होत जगत्राता ॥१॥ ब्रह्मानंद तुकें तुळे आला तुका । तो हा विश्वसखा क्रीडे जनीं ॥ध्रु.॥ शास्र शीष्ठाचार अविरुद्ध क्रिया । तुझी भक्तराया देखियेली । देऊनि तिळाजुळी काम्य निषिद्धांसी । विधिविनी योगेशी ब्रह्मार्पण ॥२॥ संत ग्रहमेळीं जग दांध्या गिळी । पैल उदयाचळीं भानु तुका । संत वृंदें तीर्थ गौतमी हरीकथा । तुकया नर सिंहस्ता भेटों आली ॥३॥ शांति पतिव्रते झाले परिनयन । काम संतर्पण निष्कामता। क्षमा क्षमापणें प्रसिद्ध प्रथा जगीं । तें तों तुझ्या अंगी मूर्तीमंत ॥४॥ दया दिनानाथा तुवा जीवविली । विश्वीं विस्तारली कीर्ती तुझी । वेदवाक्यबाहु उभारिला ध्वज । पूजिले देव द्विज सर्वभावे ॥५॥ अधर्म क्षयव्याधि धर्मांशीं स्पर्शला । तो त्वां उपचारिला अनन्यभक्ती। ब्रम्ह ऐक्यभावें भक्ती विस्तारिली । वाक्यें सफल केलीं वेदविहितें ॥६॥ देहबुद्धी जात्या अभिमानें वंचलों । तो मी उपेक्षिलों न पाहिजे। न घडो याचे पायीं बुद्धीचा व्यभिचार । मागे रामेश्वर रामचंद्र ॥७॥