भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास । गेले आशापाश निवारूनि

bhakta aise jana je dehin udas | gele ashapash nivaruni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास । गेले आशापाश निवारूनि ॥१॥ विषय तो त्यांचा झाला नारायण । नावडे धन जन माता पिता ॥ध्रु.॥ निर्वाणीं गोविंद असे मागेंपुढें । कांहीं च सांकडें पडों नेदी ॥२॥ तुका म्हणे सत्य कर्मा व्हावें साहे । घातलिया भये नरका जाणें ॥३॥