भजनी मालिका
← भजनांकडे परत

भगवंतांची नामकीर्ति । अखंड वाचे जे वदती

bhagavantanchi namakirti | akhand vache je vadati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भगवंतांची नामकीर्ति । अखंड वाचे जे वदती ॥१॥ धन्य तेचि संसारी । वाचे उच्चारी हरिनाम ॥२॥ प्रपंचाचें नोहें कोड । पुरे चाड हरिनामें ॥३॥ एका जनार्दनीं नाम गोड । होय निवाड जन्माचा ॥४॥