भजनी मालिका
← भजनांकडे परत

भागल्याचें तारूं शिणल्याची साउली । भुकेलिया घाली प्रेमपान्हा

bhagalyachen tarun shinalyachi sauli | bhukeliya ghali premapanha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भागल्याचें तारूं शिणल्याची साउली । भुकेलिया घाली प्रेमपान्हा ॥१॥ ऐसी हे कृपाळू अनाथांची वेशी । सुखाची च राशी पांडुरंग ॥ध्रु.॥ सकळां सन्मुख कृपेचिया दृष्टी । पाहे बहु भेटी उतावीळां ॥२॥ तुका म्हणे येथें आतां उरे कैंचा । अनंता जन्मींचा शीण भाग ॥३॥