भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरवी नामावळी । तुझी महादोषां होळी

baravi namavali | tujhi mahadoshan holi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बरवी नामावळी । तुझी महादोषां होळी ॥१॥ जालें आम्हांसी जीवन । धणीवरी हें सेवन ॥ध्रु.॥ सोपें आणि गोड । किती अमृता ही वाड ॥२॥ तुका म्हणे अच्युता । आमुचा कल्पतरु दाता ॥३॥