भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरवें झालें लागलों कारणीं । तुमचे राहिलों चरणीं । फेडीन संतसंगती धणी । गर्जइल गुणीं वैखरी

baraven jhalen lagalon karanin | tumache rahilon charanin | phedin santasangati dhani | garjail gunin vaikhari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बरवें झालें लागलों कारणीं । तुमचे राहिलों चरणीं । फेडीन संतसंगती धणी । गर्जइल गुणीं वैखरी ॥१॥ न वंचें शरीर सेवेसी । काया वाचा आणि मनेसीं । झालों संताची अंदणी दासी। केला याविशीं निर्धार ॥ध्रु.॥ जीवनीं राखिला जिव्हाळा । झालों मी मजसी निराळा । पंचभूतांचा पुतळा । सहज लीळा वर्ततसे ॥२॥ जयाचें जया होईल ठावें । लाहो या साधियेला भावें । ऐसें होतें राखियलें जीवें । येथूनि देवें भोवहुनी ॥३॥ आस निरसली ये खेपे । अवघे पंथ जाले सोपे । तुमचे दीनबंधु कृपें । दुसरें कांपे सत्ताधाकें ॥४॥ अंकिले पणें आनंदरूप । आतळों नये पुण्यपाप । सारूनि ठेविले संकल्प । तुका म्हणे आपें आप एकाएकीं ॥५॥