भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाळकाची बोबडी वाणी । ऐकोनी जननी संतोषे

balakachi bobadi vani | aikoni janani santoshe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बाळकाची बोबडी वाणी । ऐकोनी जननी संतोषे ॥१॥ तैसे तुम्हीं कॄपाबळें । पाळिले लळे संतजनीं ॥२॥ बाळाचे जे जे अपराध । माता न करी तयासी कोध ॥३॥ शरण एका जनार्दनी । मिळविलें गुणी आपुलिया ॥४॥