भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाळ तरुण वृद्ध ऐसे ते पाहिले । पाहुनी निमाले देखसी रया

bal tarun vruddha aise te pahile | pahuni nimale dekhasi raya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बाळ तरुण वृद्ध ऐसे ते पाहिले । पाहुनी निमाले देखसी रया ॥१॥ प्रपंच काबाड कोंबड्याचे परी । पुढेंचि उकरी लाभ नाहीं ॥२॥ तुज सुख दुःख मागील आठव । आतां भाकी कींव कांहीं रया ॥३॥ एका जनार्दनी अहा रांदलेका । भोगिसी अनेका योनी रया ॥४॥