भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाळ रांगणें रांगतु । दुडदुडां पुढें पळतु ।धरितां तो न कळें मातु । वेदशास्त्रीं जया

bal ranganen rangatu | dudadudan pudhen palatu |dharitan to na kalen matu | vedashastrin jaya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बाळ रांगणें रांगतु । दुडदुडां पुढें पळतु ।धरितां तो न कळें मातु । वेदशास्त्रीं जया ॥१॥ तो बाळरुपें नंदाघरीं । खेळ खेळे नानापरी । न कळे लाघव निर्धारी । इंद्रादिकां गे माय ॥२॥ लोणी चोरावया घरोघरीं जाय । दहीं दूध तूप लोणी आपण खाय । त्यांचे सुनेचे मुखा हात पुशी वो माय । ऐसे करुनियां पळोनी जाय ॥३॥ वासुरें सोडी घरीं जाऊन । मुलांसि उठवी चिमटुन । माथणी रांजणा करी चुर्ण । ऐसे विंदान करुनी पळे ॥४॥ शेजे असता उभयतं । जाय सोवळ्यातुन तत्त्वतां । दाढी वेणी बांधी सर्वथा । जाय परता पळोनी ॥५॥ ऐशा खोडी करी नानापरी । नटनाटक वैकुंठ जिव्हारी । एक जनार्दनीं नवल परी आगमां निगमां न कळे परोपरी ॥६॥