भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाळ माते लाते वरी । मारी तेणें संतोषे

bal mate late vari | mari tenen santoshe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बाळ माते लाते वरी । मारी तेणें संतोषे ॥१॥ सुख वसे चित्ता अंगीं । तें हें रंगीं मिळालें ॥ध्रु.॥ भक्षी त्याचा जीवमाग । आले भाग तो बरा ॥२॥ तुका म्हणे ॠणानुबंधें । सांगें सुदें सकळांसी ॥३॥