भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाळ काय जाणे जीवनउपाय । वाहे मायबाप सर्व चिंता

bal kay jane jivanaupay | vahe mayabap sarva chinta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बाळ काय जाणे जीवनउपाय । वाहे मायबाप सर्व चिंता ॥१॥ आइतें भोजन खेळणें अंतरीं । अंकिताचे शिरीं भार नाहीं ॥ध्रु॥ आपुलें शरीर रिक्षतां न कळें । सांभाळूनि लळे पाळी माय ॥२॥ तुका म्हणे माझा विठ्ठल जनिता । आमुची ते सत्ता तयावरी ॥३॥