भजनी मालिका
← भजनांकडे परत

बकाचिये परि ध्यान नको धरुं । जीवेभावें धरुं संतचरण

bakachiye pari dhyan nako dharun | jivebhaven dharun santacharan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बकाचिये परि ध्यान नको धरुं । जीवेभावें धरुं संतचरण ॥१॥ मग ते तात्काळ करिती पावन । ऐसें अनुमोदन आहे शास्त्रीं ॥२॥ ध्यानाचें ध्यान संतांचे चरण । काया वाचा मन दृढ ठेवी ॥३॥ वाच्य ते वाचक संत ते व्यापक । एका जनार्दनीं देख अंतर्बाही ॥४॥