भजनी मालिका
← भजनांकडे परत

बैसोनियां निवांत घालिसी उमान । एका हरिविण सर्व वायां न धरी गुमान

baisoniyan nivant ghalisi uman | eka harivin sarva vayan na dhari guman

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बैसोनियां निवांत घालिसी उमान । एका हरिविण सर्व वायां न धरी गुमान ॥१॥ नको खेळ खोटा सांडीं मनाचा ताठा । उमान गुमान दोन्हीं न कळे होतील जगीं चेष्टा ॥२॥ उ म्हणनें उकार रे मा म्हणणें मकार रे । न म्हणणे नश्वर देह या तिहींचा आकार रे ॥३॥ एका जनार्दनीं उमार रें । सांगो जातां न कळे खुण तया म्हणिजे गुमान रे ॥४॥