भजनी मालिका
← भजनांकडे परत

बैसोनी निकटीं सांवत्याजवळीं । कां हो वनमाळी न दिसे मज

baisoni nikatin sanvatyajavalin | kan ho vanamali na dise maj

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बैसोनी निकटीं सांवत्याजवळीं । कां हो वनमाळी न दिसे मज ॥१॥ कां हें कर्म आड आजी आलेंसें बाड । न दिसे उघड विठु माझा ॥२॥ कोणत्या लिगाडें पाडिलीसे तुटी । कां हो जगजेठी अंतरला ॥३॥ मजविण क्षण तयासी कंठेना । एका जनार्दनीं मना कठिण केलें ॥४॥