भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुती वर्णिला बहुतीं ध्याईला । परी तो पाहिल्यां पुंडलिका

bahuti varnila bahutin dhyaila | pari to pahilyan pundalika

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बहुती वर्णिला बहुतीं ध्याईला । परी तो पाहिल्यां पुंडलिका ॥१॥ करुनी कैवाड उभा केला नीट । धरुनी दोन्ही कट करीं देखा ॥२॥ पंचमहापातकी येताती ज्या भावें । दरुशनें त्या द्यावें वैकुंठ पद ॥३॥ एका जनार्दनीं भक्तांचा अंकीत । उभाचि तिष्ठत अठ्ठावीस युगें ॥४॥