भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुतापुण्यें करूनि जोडला नरदेह । नाहीं त्याचा वेवसाव घडला कांहीं

bahutapunyen karuni jodala naradeh | nahin tyacha vevasav ghadala kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बहुतापुण्यें करूनि जोडला नरदेह । नाहीं त्याचा वेवसाव घडला कांहीं ॥१॥ न करावें तें केलें मनामागें धांवणें । परि नारायणें करुणा केली ॥२॥ आवरुनि इंद्रियें धरियेलीं हातीं । कामक्रोधाची शांती केली सर्व ॥३॥ वायां जाये परि श्रीगुरु भेटला । एका जनार्दनीं जाहला कृतकत्य ॥४॥