भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुतांच्या मता । आम्हीं न लागुं सर्वथा

bahutanchya mata | amhin na lagun sarvatha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बहुतांच्या मता । आम्हीं न लागुं सर्वथा ॥१॥ धरुं संतांचा सांगात । तेणें होय आमुचें हित ॥२॥ जाऊं पढरीसी । नाम गाऊं अहर्निशी ॥३॥ करुं हाचि नित्य नेम । आणिक नको निजधाम ॥४॥ एका जनार्दनीं नाम । गाऊं आवडीनें राम ॥५॥