भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुतांची मतांतरें तीं टाकुनीं । विठ्ठलचरणीं बुडी दें कां

bahutanchi matantaren tin takunin | viththalacharanin budi den kan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बहुतांची मतांतरें तीं टाकुनीं । विठ्ठलचरणीं बुडी दें कां ॥१॥ नव्हें तुज बाधा काळाची आपदा । ध्याई तु गोविंदा प्रेमभरीत ॥२॥ जनार्दनाचा एका लाहुन चरणीं । बोलतसे वाणी करूणाभरीत ॥३॥