भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुतां पुरे ऐसा वाण । आलें धन घरासी

bahutan pure aisa van | alen dhan gharasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहुतां पुरे ऐसा वाण । आलें धन घरासी ॥१॥ घ्या रे फुका मोलेंविण । नारायण न भुला ॥ध्रु.॥ ऐका निवळल्या मनें । बरव्या कानें सादर ॥२॥ तुका म्हणे करूनि अंतीं । निश्चिंती हे ठेवावी ॥३॥