भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुतां जातीचा केला अंगीकार । बहुत ही फार सर्वोत्तमें

bahutan jaticha kela angikar | bahut hi phar sarvottamen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहुतां जातीचा केला अंगीकार । बहुत ही फार सर्वोत्तमें ॥१॥ सरला चि नाहीं कोणांचिये वेचें । अक्षोभ्य ठायींचें ठायीं आहे ॥ध्रु.॥ लागत चि नाहीं घेतां अंतपार । वसवी अंतर अणुचें ही ॥२॥ तुका म्हणे केला होय ठाकीऐसा । पुरवावी इच्छा धरली ते ॥३॥