भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुतां जन्मां अंतीं । जोडी लागली हे हातीं

bahutan janman antin | jodi lagali he hatin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहुतां जन्मां अंतीं । जोडी लागली हे हातीं ॥१॥ मनुष्यदेहा ऐसा ठाव । धरीं पांडुरंगीं भाव ॥ध्रु.॥ बहु केला फेरा । येथें सांपडला थारा ॥२॥ तुका म्हणे जाणे । ऐसे दुर्लभ ते शाहाणे ॥३॥