भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुत पुराणें बहुत मतांतरें । तयांच्या आदरें बोल नोहे

bahut puranen bahut matantaren | tayanchya adaren bol nohe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बहुत पुराणें बहुत मतांतरें । तयांच्या आदरें बोल नोहे ॥१॥ शाब्दिक संवाद नोहे हा विवाद । सबाह्म परमानंद हृदयामाजीं ॥२॥ नोहे हें कवित्व प्रेमरस काढा । भवरोग पीडा दुरी होय ॥३॥ नोहे हें कामानिक आहे पैं निष्कामनिक । स्मरतां नासे दुःख जन्मांतरीजें ॥४॥ एका जनार्दनीं माझा तो निर्धार । आणिक विचार दुजा नाहीं ॥५॥