भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुत जन्मांचे सुकृत । तयांसी घडत संतसंग

bahut janmanche sukrut | tayansi ghadat santasang

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बहुत जन्मांचे सुकृत । तयांसी घडत संतसंग ॥१॥ धन्य वैष्णव भुमंडळी । दरुशन मेळीं जीव तरती ॥२॥ एका जनार्दनीं विश्वास । निजदास संताचा ॥३॥