भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुत गेलीं वांयां । न भजतां पंढरीराया

bahut gelin vanyan | na bhajatan pandhariraya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहुत गेलीं वांयां । न भजतां पंढरीराया ॥१॥ करिती कामिकांची सेवा । लागोन मागोन खात्या देवा ॥ध्रु.॥ अवघियांचा धनी । त्यासी गेलीं विसरोनि ॥२॥ तुका म्हणे अंतीं । पडती यमाचिया हातीं ॥३॥