भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुत दाविती खुणा । आमुच्या नये त्या मना । आजी आला पाहुणा । गुरुराव

bahut daviti khuna | amuchya naye tya mana | aji ala pahuna | gururav

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बहुत दाविती खुणा । आमुच्या नये त्या मना । आजी आला पाहुणा । गुरुराव ॥१॥ सांगे बोधाचिया गोष्टी । म्हणे का रें होतां कष्टी । या संसाराची तुटी । करा करा लवलाहे ॥२॥ कां रे होता उगेच उदास । आशा मोह तोडा पाश । कां रे कासावीस । होतां वाउगे परदेशी ॥३॥ धरा धरा मंत्र मुखीं । जेणें शिवादिक जाहलें सुखीं । तुमचें तुम्हां न कळे शेखीं । वाउगें कां शिणतां ॥४॥ अरे नको वेरझारा । चुकवा जन्ममरणा सारा । एका जानर्दनीं म्हणे । धरा विश्वास संतवचनीं ॥५॥