भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुजन्में सोस केला । त्याचा झाला परिणाम

bahujanmen sos kela | tyacha jhala parinam

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहुजन्में सोस केला । त्याचा झाला परिणाम ॥१॥ विठ्ठलसें नाम कंठीं । आवडी पोटीं संचितें ॥ध्रु.॥ येथुन तेथवरी आतां । न लगे चिंता करावी ॥२॥ तुका म्हणे धालें मन । हें चि दान शकुनाचें ॥३॥