भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुजन्में केला लाग । तो हा भाग लाधलों

bahujanmen kela lag | to ha bhag ladhalon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहुजन्में केला लाग । तो हा भाग लाधलों ॥१॥ जीव देइन हा बळी । करीन होळी संसारा ॥ध्रु.॥ गेलें मग नये हाता । पुढती चिंता वाटतसे ॥२॥ तुका म्हणे तांतड करूं । पाय धरूं बळकट ॥३॥